Saturday, May 26, 2018

मुखवटे : भाग पहिला

यावेळी मात्र थोडं निर्धास्तपणे मी कामीनीच्या फ्लॅट मधून बाहेर पडलो. नको म्हणता म्हणता आज तिसऱ्यांदा मी मर्यादा ओलांडली होती पण आधीसारखी ना आज भीती वाटली ना लाज वाटत होती. जाऊदे या महिन्याच्या घराच्या हफ्ताची सोय झाली त्यामुळे हे बरोबर की चूक हा विचार करायचाच नाही असे मी ठरवले आहे.
कालपर्यंत बरोबर वाटणाऱ्या गोष्टी किती चुकीच्या होत्या ते आता जसं जाणवत आहे तसेच आज चूक वाटणारी गोष्ट उद्या बरोबर वाटेलही हे आता कोणी येऊन सांगण्याची गरज नाही. पण आज हे करणे गरजेचे होते त्यामुळे मी केले. आता बरोबर का चूक ते शेवटी चित्रगुप्त ठरवेल. त्याला भेटायची वेळ येईल तेव्हा बघू.
आणि हो Guilty वाटून घेण्याचे काही कारण नाही. फ्लॅट मध्ये होतो तेव्हा मी काही प्राध्यापक म्हणून लेक्चर घ्यायला गेलो नव्हतो. त्या पांढरपेशी प्राध्यापकी नोकरदाराचा मुखवटा त्याचदिवशी उतरवला होता जेव्हा मी पहिल्यांदा कामिनी सोबत तिच्या फ्लॅटवर आलो होतो तेव्हा. तो मुखवटा आता फक्त कॉलेज कॅम्पस पुरताच राहिला आहे. एकाच मुखवट्याने तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व पात्रांचा अभिनय पार पाडू शकता हे निव्वळ अशक्य आहे. स्वतःशीच बोलता बोलता लिफ्ट पार्किंग पर्यंत केव्हा आली ते समजलच नाही. पार्किंग मध्ये कॅब येऊन थांबली होती. मी गाडीत बसतो ना बसतो तेवढ्यात मोबाईलवर मेसेजची टोन वाजली. Paytm चा मेसेज आला असेल या खात्रीने मेसेज बघितला तर दहा हजार रुपये क्रेडिट झाल्याचा मेसेज होता. गेट मधून गाडी बाहेर निघताना नकळत फ्लाईंग किस तिच्या फ्लॅटकडे पाहून पाठवला. बाल्कनीमध्ये ती होती का नाही समजले नाही. एवढ्या खालून सविसाव्या मजल्यावरचे दिसणे शक्यही नव्हते. मी ड्रॉयव्हरला गाडी सदाशिवपेठेतल्या ज्ञानप्रबोधिनी जवळ न्यायला सांगितली.
आपल्या नेहमीच्या ज्ञानप्रबोधणीच्या कॉफी शॉप मध्ये कोल्ड कॉफी घेतली. मोबाईल बघितला. दहा हजार रु क्रेडिट झाल्याचा मेसेज पुन्हा वाचला. कॉफी संपली आता पुन्हा नाही करायचं आजच शेवटचं होत असं ठरवून निघालो.
कामिनी सोबतच्या गेल्या तीन भेटीत कामयोगाचे जवळपास सगळे करून झाले होते. लॅपटॉप घेऊन जातो तेही एक बरंच आहे. सगळेच इंग्लीश प्रकार आपल्याला जमतील असे नाही ना. आणि विडिओ असले की कसं वातावरण जरा कम्फर्टेबल व्हायला मदत होते. आज तर कमिनीने आजचे आणि पाठीमागचे सगळे पैसे अक्षरशः वसूल करून घेतले. महिन्याभरापूर्वी अशी काही अनुभव आपल्या आयुष्यात येतील याची पुसटशी कल्पना देखील मी केलेली नव्हती. कोण कुठली कामिनी कोणास ठावुक साधारण एक महिन्याभरापूर्वी गोष्ट असेल. रविवारी आपल्या नेहमीच्या पद्धतीने थोडी पुस्तके बघावी म्हणून घराबाहेर पडलो. पेपर मध्ये सकाळी वाचले होते की कामिनी शर्मा म्हणून कोणाचे तरी चित्र प्रदर्शन आहे. त्याच पुस्तक पेठेच्या रस्त्यावरच्याच भालजी पेंढारकर कालगृहात ते चित्रांचे प्रदर्शन होते म्हणून पाहायला गेलो.  त्या चित्रांमधलं काही समजलं तर नाहीच पण प्रत्येक चित्रात गडद रंगाच्या त्या कमालीच्या छटा पाहून मला अस्वस्थ वाटू लागले होते. कलाकारी सारीच काही अप्रतिम पण न समजणारे. पाणी भरत असलेल्या त्या बाईचे चित्र तर किती कामुक.
चित्रकार अगदी पदाराआडून दिसणाऱ्या गुहेत घेऊन जातो की काय अस वाटत होतं.  कोण आहे ती
चित्रकार ते पाहण्यासाठी मी जरा आजूबाजूला नजर टाकली. एका ठिकाणी चार पाच आर्टिस्टिक टाइप चे केस वाढवलेले लोक आणि एक ब्लॅक साडीमधली महिला हसून गप्पा मारताना दिसले. मी मोर्चा वळवला की हीच ती असावी.
"कामिनी मॅम प्लिज एक सेल्फी"
अस म्हणत एका प्रेक्षकांने एका पोस्टर सोबत तिचा फोटो काढण्याची तिला रिक्वेस्ट
केली.
"प्लीज डोन्ट कॉल मी मॅम"
अस म्हणत ती एका मोहक पोज मध्ये उभी राहिली आणि त्याला सेल्फी काढू दिला.
खरं तर फस्ट इम्प्रेशन मध्ये कामिनी भलतीच मॉडर्न वाटली मला. माझ्या पेक्षाही बरीच उंच; आलेल्या पाहुण्यांना आपल्या चित्रांना दाखवण्यात गुंग दिसली. काळ्या रंगाच्या साडीत अगदी उठून दिसत होती. कमरेचा बराचसा भाग उघडाच.. मुद्दामहुन कदाचित आपल्या कमरेवरच्या जलपरीचा टॅट्टू दाखविण्यासाठीच अशी साडी नेसली असावी. मी दोन तीन वेळा तिला न्याहाळताना नजरानजर झाली आणि मी इकडेतिकडे पाहत असल्याचे नाटक करून पुन्हा चित्रांकडे पाहत असल्याचे दाखवून जवळ गेलो. कपाळावर जांभळ्या रंगाचा मोठा टिळा आणि कोरीव भुवया, गळ्यात भल्या मोट्या जिप्सी मण्यांची माळ तसेच कानातही हे सगळं न्याहाळून मी विचार करू लागलो की ही बाई खरेच चित्रकार आहे की मॉडेल.. असा प्रश्न मला सोडा पण कोणालाही पडला असता. गर्दी वाढू लागली तसे ज्यास्त अस्वस्थ वाटू लागले. तिच्यासोबत एक सेल्फी काढावा असा क्षणभर मनात विचार आला पण पुन्हा मनातल्या मनात नको म्हणत बाहेर पडू लागली. जाता जाता तिथल्या टेबलावरच्या फीड बँक च्या वहीत रिमार्क लिहिला
I would like to see u all your picture'आनंद - 750XXXXXXX
axxxxxxx_xx@gmail.com
संध्याकाळी घरी आल्यावर आधी कामिनी शर्मा Google केले. तिची ऑफिशियल वेबसाईट सापडली त्यात बरीचशी इतर चित्रे व चित्र तिने भरविलेल्या चित्र प्रदर्शनाची माहिती पाहायला मिळाली. पण तिचे स्वतःचे फोटो काही पाहायला मिळाली नाहीत म्हणून मी तिची प्रोफाइल FB वर search केली. तिला friend request देखील पाठवली.
दुसऱ्या दिवशी पुन्हा कॉलेज सुटल्यावर प्रदर्शन पाहायला गेलो.. कामिनी नव्हती म्हणून अर्धा एक तास फिरून निघायचं ठरवलं तेवढ्यात ती आली.. आजही ती खासच दिसत होती.. खासच म्हणण्यापेक्षा थोडी ज्यास्तच बोल्ड…
क्रमश:
[यातला "मी" हा फक्त प्रथम पुरुषी निवेदक असून सर्व पात्र व घटना काल्पनिक आहेत. याचा कोणाच्याही वैयक्तिक आयुष्याशी काही संबंध
नाही. असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.]